Wednesday, March 22, 2023
Homeकोरोनानिर्बंध आणि कारवाया फक्त सर्वसामान्यांसाठीच कां ? भाजपाचा सवाल !

निर्बंध आणि कारवाया फक्त सर्वसामान्यांसाठीच कां ? भाजपाचा सवाल !

मुंबई : राज्यात करोना वाढतो आहे. या पार्श्‍वभूमीवर कडक पावले उचलली जातील असे ठाकरे सरकार एकीकडे म्हणत आहे. मात्र दुसरीकडे याच सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार सुप्रिया सुळे मोठ-मोठे कार्यकर्ता मेळावे घेत आहेत, असे भाजपने ट्विटमध्ये म्हटले आहे. राज्याचे मंत्री आणि खासदार असे मेळावे घेत असतील तर मग कडक निर्बंध आणि कारवाया फक्त सर्वसामान्यांसाठीच का?, असा सवाल भाजपने विचारला आहे. या ट्विटमध्ये भाजपने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग केले आहे.
राज्यात पुन्हा करोनाने डोके वर काढले असून राज्य सरकारने करोनाची वाढ रोखण्यासाठी शथीर्चे प्रयत्न सुरू केले आहेत. या दरम्यान राज्यातील सरकारमधील मंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे नेते हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. हा आरोप करताना भाजपने राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

भारतीय जनता पक्षाने आपल्या ट्विटसोबत खासदार सुप्रिया सुळे आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यक्रमाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यात हा खोटेपणा कशासाठी असा सवाल भारतीय जनता पक्षाने विचारला आहे. करोना वाढतोय म्हणून कडक पावले उचलावी लागतील असे एकीकडे ठाकरे सरकार म्हणत आहे. मात्र, दुसरीकडे याच सरकारचे मंत्री आणि नेते मोठ-मोठे मेळावे आयोजित करत असल्याचे भाजपाने म्हटले आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा करोनाने डोके वर काढले करोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हे लक्षात घेत राज्य सरकारने राज्यातील अनेक भागात कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे “मी जबाबदार” या मोहिमेची घोषणा करीत “मास्क घाला-शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा!” अशी विनंती केली आहे. मग सरकारमधील जबाबदार मंत्री या गैरजीम्मेदार कसे वागत आहे ? त्यावर प्रथम निर्बंध आणण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments