Tuesday, November 29, 2022
Homeचंद्रपूरगोंडकालीन जुनोना तलाव परिसरात श्‍वास गुदमरतोय!

गोंडकालीन जुनोना तलाव परिसरात श्‍वास गुदमरतोय!

निसर्गाच्या सुगंधाऐवजी घाणीचा दुर्गंध; इको-प्रोतर्फे तलाव परिसर स्वच्छता !

चंद्रपूर : गोंडकालीन राजवटीत मनसोक्त भंम्रती आणि जलविहार करण्यासाठी ज्या स्थळी राजा-राणी यायचे, त्या जुनोना तलावाच्या निसर्गरम्य ठिकाणी पक्ष्यांचा चिवचिवाट कानी यायचा. म्हणूनच आज पर्यटक मोठय़ा हौसेने या ठिकाणी आनंद लुटायला येतात. पण, भान हरपून आणि पर्यावरणाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून घाण करू लागले आहेत. त्यामुळे या आल्हाददायक ठिकाणी आता निसर्गाच्या सुगंधाऐवजी घाणीचा दुगर्ंध पसरत आहे. इथे पक्ष्यांसह माणसांचादेखील श्‍वास गुदमरू लागलाय. पक्षी सप्ताहानिमित्त पक्षीप्रेमी पक्षी निरीक्षणासाठी या जुनोना तलावावर गर्दी करू लागले आहेत. या उपक्रमात अनेक मान्यवर सहभागी झाले होते. या तलाव मौजमजा करायला येणारी मंडळीदेखील सुटीच्या दिवशी या तलावावर गर्दी करताना दिसत आहे. निसर्ग पर्यटनाच्या नावाखाली पार्टी, दारू पिणे, मासांहर करण्याचा प्रकार बिनधास्त सुरू आहे. या पार्टीतील युज अँण्ड थ्रो प्लेट, प्लास्टिक ग्लास, दारू बॉटल, खाद्य पदार्थांचे प्लास्टिक, पाणी बॉटल याचा कचरा करतात. बेलगाम लोकांवर नियंत्रण राहावे म्हणून जुनोना ग्रामपंचायत गाव वेशीवर प्रत्येक वाहनाकडून शुल्क घेते. खरे तर हे उपद्रव शुल्क आहे. मात्र, यामुळे पैसे गोळा करून परिसर स्वच्छता होताना दिसत नाही. सदर तलाव दूषित, अस्वच्छ होऊ नये म्हणून बंधने टाकली जात नाही. तर पैसे घेण्याची गरज कशाला? यावर जलसंपदा विभाग, वनविभाग आणि जिल्हा परिषद यांनी हस्तक्षेप करून तलावाचे सौंदर्य अबाधित राहील याकडे लक्ष पुरवून उपद्रवी पर्यटक यांचेवर निबर्ंध टाकण्याच्या दृष्टीने पावले उचलावी, तसे न झाल्यास इको-प्रोने यापुढे आंदोलनाची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या थंडी नुकतीच सुरू झाली आणि तलावात पाणीसुद्धा भरपूर आहे. अद्याप स्थलांतरित पक्षी या तलावावर पोहोचले नाहीत. मात्र, ज्यांची प्रतीक्षा नसते ते नियमित येतात आणि तलाव परिसर अस्वच्छ-गंदगी करून जातात, हे चित्र पक्षीनिरीक्षणाच्या निमित्ताने पुढे आले. इको-प्रोतर्फे पक्षी सप्ताहानिमित्त जुनोना येथील तलाव पक्षी अधिवास परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. निसर्गरम्य जुनोना तलाव फक्त तलाव नसून, पार्टी करण्याचे ठिकाण नसून, विविध स्थानिक पक्षी, स्थलांतरित पक्षी अधिवास आहे, जंगलातील वन्यप्राणी यांचा अधिवास क्षेत्रातील पाण्याचे महत्त्वाचे स्रोत आहे. याचे सौंदर्य आणि महत्त्व कायम राखले जावे याकरिता सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या परिसरात आल्यानंतर कुठलेही प्रदूषण, अस्वच्छता आपल्या हाताने होणार नाही याची जाणीव असू द्या..!

यावर निर्बंध आणण्यासाठी उपद्रवी पर्यटकांवर लक्ष ठेवणारी यंत्रणा येथे कार्यान्वित करण्याची मागणी इको-प्रो संघटनेने केली आहे. दरम्यान, इको-प्रो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसरात उपद्रवी पर्यटकांनी टाकलेला कचरा उचलून परिसर स्वच्छ केला. जुनोना तलाव स्थलांतरिक पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. अद्याप स्थलांतरित पक्षी या तलावावर पोहोचले नाहीत. मात्र पर्यटक येथे येवून अस्वच्छता पसरवून जात असल्याने इको-प्रो ने नाराजी व्यक्त केली आहे. इको प्रो च्या स्वच्छता अभियानात धर्मेंद्र लुनावत, राजेश व्यास, अमोल उट्टलवार, सुधीर देव, राजू काहीलकर, आकाश घोडमारे, सुनील पाटील, जयेश बैनलवार, सचिन धोतरे, सचिन भांदककर, देवनाथ गंडाटे, राममिलन सोनकर, सुभाष टिकेदार, मनीषा जैस्वाल, राजु हाडगे, गौरव वाघाडे, सौरभ शेटे, शंकर पोईनकर, सुनील लिपटे सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments