Wednesday, March 22, 2023
Homeकोरोना24 तासात 195 बाधित;  दोन बाधितांचा मृत्यू

24 तासात 195 बाधित;  दोन बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 1642 कोरोना मुक्त

बाधितांची संख्या पोहोचली 3641 वर

24 तासात 195 बाधित;  दोन बाधितांचा मृत्यू

उपचार घेत असणारे 1958 बाधित

चंद्रपूर, दि. 5 सप्टेंबर: जिल्ह्यात 24 तासात नवीन 195 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 3 हजार 641 झाली आहे. आतापर्यंत 1 हजार 642 बाधित कोरोना मुक्त झाले आहेत. तर सध्या 1 हजार 958 बाधितांवर  उपचार सुरू आहे. नागरिकांनी दैनंदिन काम करतांना सोशल डिस्टन्सिंग चे पालन करावे, वेळोवेळी हात साबणाने अथवा सॅनिटायजरने स्वच्छ करावे तसेच बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आरोग्य विभागाला कळवा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये  रामनगर चंद्रपूर येथील 56 वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे.  या बाधिताला 31 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  उपचारादरम्यान 4 सप्टेंबरला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे बाधिताचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरा मृत्यु हा 76 वर्षीय गणेश नगर, तुकूम चंद्रपूर येथील पुरुष बाधिताचा आहे. 3 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 4 सप्टेंबरला सायंकाळी बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता. जिल्ह्यात आतापर्यंत 41 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी, चंद्रपूर 37, तेलंगाणा एक, बुलडाणा एक आणि गडचिरोली 2 बाधितांचा समावेश आहे.

चंद्रपूर शहर व परिसरात 24 तासात 95 बाधित पुढे आले आहेत. त्याचबरोबर, सावली तालुक्यातील 29, बल्लारपूर तालुक्यातील 17, गोंडपिपरी तालुक्यातील 12, ब्रह्मपुरी तालुक्यातील 9, मूल तालुक्यातील 7, राजुरा तालुक्यातील 7, वरोरा तालुक्यातील 3, कोरपना तालुक्यातील 3, भद्रावती तालुक्यातील 5, पोंभूर्णा तालुक्यातील 5, नागभीड तालुक्यातील दोन तर सिंदेवाही तालुक्यातील एक असे एकूण 195 बाधित पुढे आले आहे.

शहर व परिसरात या ठिकाणी आढळले बाधित:

चंद्रपूर शहरातील हिंग्लाज भवानी वार्ड, ठक्कर कॉलनी परिसर, बस स्टॉप परिसर, बाबुपेठ वार्ड, समाधी वार्ड, साईबाबा वार्ड, ताडोबा मोहर्ली गाव, रामनगर पोलिस क्वॉटर तुकुम, तुलसी नगर वडगाव, घुटकाळा वार्ड, नगीना बाग, हरिओम नगर, वृंदावन नगर, हवेली गार्डन परिसर, विठ्ठल मंदिर वार्ड, बालाजी वार्ड, महाकाली कॉलरी परिसर, गंज वार्ड, दाताळा रोड परिसर, स्नेह नगर, गणेश नगर तुकुम, ऊर्जानगर, नकोडा, दुर्गापुर, यशवंतनगर पडोली, पोस्टल कॉलनी, साईकृपा नगर, तुकडोजी नगर भागातून बाधित पुढे आले आहे.

तालुक्यातून या ठिकाणी आढळले बाधित:

मुल येथील वार्ड नंबर 11 तर तालुक्यातील नवेगाव, ताडाळा, राजगड, नांदगाव गावातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सावली तालुक्यातील व्याहाड, किसान नगर, वाघोली भागातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील गोवरी, नोकारी, माता मंदिर वार्ड, गौरी कॉलनी परिसर, सोमनाथपूर वार्ड, जवाहर नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे.

बल्लारपूर तालुक्यातील टिळक वार्ड, दादाभाई नौरोजी वार्ड, विवेकानंद वार्ड, राणी लक्ष्मीबाई वार्ड, गौरक्षण वार्ड, कन्नमवार वार्ड, गोकुळ नगर, पेपर मिल कॉलनी परिसर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.गोंडपिपरी तालुक्यातील धाबा, वडोली, परिसरातून बाधित पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील सायवन, सूर्य मंदिर वार्ड, ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातुन पॉझिटिव्ह पुढे आले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments