घुग्गुस वासियांच्या प्रेमाची परतफेड कधिही करू शकणार नाही – आ. सुधीर मुनगंटीवार
आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने घुग्गुस शहरात अभूतपूर्व विकासकामे – देवराव भोंगळे
सोशल डिस्टंन्सींग पाळत घुग्गुस शहरात 75 विविध विकासकामांचे लोकार्पण संपन्न
चंद्रपूर :- घुग्गुस शहरातील नागरिकांनी गेली 25 वर्षे माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. या शहराच्या विकासासाठी मी माझ्यापरिने योगदान दिले आहे मात्र कितीही विकास केला तरीही घुग्गुस वासियांच्या प्रेमाची परतफेड मी करू शकणार नाही. देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात घुग्गुस शहरात जी विकासकामे पूर्णत्वास आली त्यांचे लोकार्पण ज्या भव्य दिव्य स्वरूपात झाले ते एखादया मोठया नगर परिषद क्षेत्रात सुध्दा होवू शकणार नाही. जनतेची मनापासून सेवा करणारे सरपंच, ग्राम पंचायतीचे पदाधिकारी यांच्या परिश्रमातुन साकारलेली ही विकासकामे म्हणजे कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन विकास कसा घडू शकतो याचे उत्तम उदाहरण असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक 31 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्हयातील घुग्गुस शहरात विविध विकासकामांचे लोकार्पण आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा घुग्गुस शहर अध्यक्ष विवेक बोढे, जिल्हा परिषद चंद्रपूरच्या सभापती नितू चौधरी, पंचायत समिती उपसभापती निरीक्षण तांड्रा, घुग्गुस ग्राम पंचायत सरपंच संतोष नुन्ने, विनोद चौधरी, ग्राम पंचायत सदस्य राजकुमार गोडसेलवार, संजय तिवारी, साजन गोहणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी घुग्गुस शहरातील बहीरमबाबा देवस्थान ओपनस्पेसमधील बगीचा, तिलनगर मंदीर ओपनस्पेस मधील बगीचा, सुभाषनगर चिल्ड्रन पार्क, आफीसर्स कॉलनी ओपनस्पेसमधील बगीचा, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी गार्डन, रामनगर ग्राऊंड येथील बगीचा, हनुमान मंदीर ओपनस्पेस येथील बगीचा, माथनकर कॉलनी श्रीकृष्ण मंदीर येथील ओपनस्पेसमधील बगीचा, विनोद थेरे कॅमीकल ओपनस्पेसमधील बगीचा, डॉ. मिरपगार हॉस्पीटल समोरील ओपनस्पेसमधील बगीचा, विविध ठिकाणी आर ओ मशीन, मंदीर परिसरांना वॉल कंपाऊंड व सौंदर्यीकरण, ओपनस्पेसचे सौंदर्यीकरण, हायमास्ट लाईट लावणे आदी 75 विकासकामांचे लोकार्पण संपन्न झाले. यातील प्रमुख 25 विकास कामांचे लोकार्पण आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सोशल डिस्टंन्सींगचे पालन करत करण्यात आले.
यावेळी बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, घुग्गुस शहराचा सर्वांगिण विकास आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातुनच झाला आहे. सिमेंट कॉंक्रीट रस्ते, भूमीगत गटारे, 5000 एलईडी लाईट, हायमास्ट लाईट, पाणी पुरवठा योजना, शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी 9 आर ओ मशीन, ग्रामीण रूग्णालय बांधकामाला मंजूरी, नविन बस स्थानकाची निर्मीती, वर्धा नदीवर नविन पुलाचे बांधकाम, बाजारासाठी ओटे, विविध सभागृहांची बांधकामे, ओपनस्पेसला वॉलकंपाऊंड, गांधी चौकाचे सौंदर्यीकरण, पशुवैद्यकिय दवाखाना, पाण्याच्या टाकीसाठी सोलार सिस्टीम व ऑटोमायझेशन, नविन शाळा इमारतीचे बांधकाम, अंगणवाडी इमारतीचे बांधकाम, शहरात 300 बोअरींग्स, 10 बगीच्यांची निर्मीती, सर्वधर्मीयांच्या स्मशान भूमीचा विकास अशी विकासकामांची मोठी मालिका आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने घुग्गुस शहरात निर्माण झाली आहे. घुग्गुस शहराला त्यांच्या माध्यमातुनच देखणे रूप प्राप्त झाले आहे, असेही देवराव भोंगळे यावेळी बोलताना म्हणाले. वैशिष्टयपूर्ण पध्दतीने प्रत्येक विकासकामांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.
यावेळी हसन शेख, प्रकाश बोबडे, सिनू इसारप, पूजा दुर्गम, लक्ष्मी नलभोगा, वैशाली ढवस, सुचिता लुटे, सुषमा सावे, नंदा कांबळे, कुसुम सातपुते, चिन्नाजी नलभोगा, सुरेंद्र भोंगळे, शरद गेडाम, अजगर खान, नितीन काळे, विवेक तिवारी, अमोल थेरे, महेश लट्टा, दीपक मिसाला, लक्ष्मण कटकम, गुरूदास तग्रपवार, मल्लेश बल्ला, सतीश कामपेल्ली, राजू बोंबले, धनराज पारखी, तुलसीदास ढवस, अनंता बहादे, राजेश मोरपाका, प्रवीण सोदारी, पांडू थेरे, मुस्तफा शेख, बबलु सातपुते, विजय माथनकर, मुकेश कामतवार, राजू भोंगळे, पियुष भोंगळे, मंगेश राजूरकर, प्रणय बोकडे, केतन वझे, अनुपम जोगी, शुभम सुगरवार, शेषराव कोवे, पंकज रामटेके, गौरव ठाकरे, सुनिता पाटील, चंद्रकला मन्ने, वंदना करकाउे, मीना गेडाम, सुरज झाडे, वसंता भोंगळे, प्रज्वल अंड्रस्कर, मधुकर धांउे, विनोद पिंपळशेंडे, विनोद थेरे, सुशील डांगे, मंगेश पचारे, क्रिष्णा कपारे, गजानन जोगी, गणेश खुटेमाटे, मयूर डाखेर, राजू बोड्डू, सागर गद्दल, वंशी महाकाली, राजू चौधरी, नरेश पुल्लुरी, विनोद कलापेल्ली, वेणू कामपेल्ली, दीपक मारपेल्ली, रोहिती गोरे, अमोल चिंचोलकर, भास्कर मारमेल्ली, सागर वडलुरी, प्रसाद मल्लारप, राजू मल्लारप, अभिलाष महाकाली, आर्या मरपेलो, प्रमोद भातकुले, नानाजी राजुरकर, पंढरीनाथ आगलावे, पुंडलिक धांडे, नरेंद्र लोडे, विजय सपाट, विनोद राजूरकर, संजय धोबे, तुषार जुनघरी, ओमेश पिदुरकर आदींची उपस्थिती होती.