Home चंद्रपूर बुधवार 5 ऑगस्‍ट ला भाजपा चंद्रपूर महानगर शाखेतर्फे भक्‍तीमय सोहळा !

बुधवार 5 ऑगस्‍ट ला भाजपा चंद्रपूर महानगर शाखेतर्फे भक्‍तीमय सोहळा !

0

अयोध्‍येत राममंदीराचा भूमीपूजन सोहळा सुरू असतांना चंद्रपूरात श्री रामरक्षा स्‍तोत्राचे पठन होणार आणि सायंकाळी दीप प्रज्‍वलनाने आसमंत उजळणार !

भाजपा चंद्रपूर महानगर शाखेचा उपक्रम !

चंद्रपूर : दिनांक 5 ऑगस्‍ट 2020 रोजी उत्‍तरप्रदेशातील अयोध्‍येत श्री राममंदीराचा भूमीपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्‍या हस्‍ते संपन्‍न होणार आहे. दुपारी 12.15 वा. भूमीपूजन संपन्‍न होत असताना चंद्रपूर महानगरात पवित्र श्री रामरक्षेचे भक्‍तीमय सुर निनादणार असून सायं. 6.00 वा. घराघरात दीपप्रज्‍वलन करून रामभक्‍तीच्‍या प्रकाशाने आसमंत उजळणार आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या संकल्‍पनेतुन हा भक्‍तीमय सोहळा भाजपा चंद्रपूर महानगर शाखेतर्फे आयोजित करण्‍यात आला आहे.

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या ऐतिहासिक निर्णयामुळे अयोध्‍या येथील पवित्र श्री राममंदीराच्‍या निर्माणाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा विषय भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रभाई मोदी यांच्‍या पंतप्रधान पदाच्‍या कार्यकाळात सकारात्‍मकरित्‍या निकाली निघाला आणि देशातील करोडो रामभक्‍त नागरिकांना मोठा आनंद झाला. अयोध्‍या येथील श्री राममंदीर भारतवर्षाचा मानबिंदू आहे. या राममंदिरासाठी 492 वर्षे रामभक्‍तांनी संघर्ष केला आहे. भारतीय जनता पार्टीच्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍यांनी व असंख्‍य कारसेवकांनी यासाठी कारसेवेच्‍या माध्‍मयातुन केलेला संघर्ष या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरलेला आहे.

दिनांक 5 ऑगस्‍ट रोजी दुपारी 12.15 वा. भूमीपूजन संपन्‍न होत असताना श्री रामरक्षा स्‍तोत्राचे पठन करावे आणि सायं. 6.00 वा. घराघरात दीपप्रज्‍वलन करून श्रीरामाला वंदन करावे, अशी विनंती भाजपातर्फे करण्‍यात आली आहे. यासंदर्भात आवाहन करणारे पत्रक भाजपातर्फे चंद्रपूरात घरोघरी वितरीत करण्‍यात येणार असून या पत्रकात श्री रामरक्षा स्‍तोत्र ऐकण्‍यासाठी क्‍यु. आर. कोड देण्‍यात आला आहे. त्‍याचप्रमाणे कारसेवेचे स्‍मरण करणारा व्हिडीओ बघण्‍यासाठी एक क्‍यु. आर. कोड देण्‍यात आला आहे. हे क्‍यु. आर. कोड स्‍कॅन करून रामरक्षा म्‍हणावी अशी विनंती पत्रकाद्वारे करण्‍यात आली आहे. या भक्‍तीमय सोहळयात माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर हे सुध्‍दा सहभागी होणार आहे.

अयोध्‍येतील श्री राममंदीर हा भारतवर्षाचा मानबिंदू आहे. या राममंदीराच्‍या निर्माणाचा भूमीपूजन सोहळा भक्‍तीमय वातावरणात साजरा करण्‍यासाठी चंद्रपूरकर नागरिकांनी भाजपाच्‍या या आवाहनाला प्रतिसाद द्यावा व या प्रक्रियेत सहभागी व्‍हावे असे आवाहन भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे, भाजपा महानगर अध्‍यक्ष (जिल्‍हा) डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, चंद्रपूरच्‍या महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, नगरसेवक वसंत देशमुख, माजी महापौर सौ. अंजली घोटेकर, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, विशाल निंबाळकर, देवानंद वाढई, सौ. आशा आबोजवार, सौ. माया उईके, सौ. शिला चव्‍हाण, सुभाष कासनगोट्टूवार, सौ. शितल गुरनुले, सौ. निलम आक्‍केवार, स्‍वामी कनकम, सौ. ज्‍योती गेडाम, सौ. कल्‍पना बगुलकर, सौ. खुशबु चौधरी, सौ. संगिता खांडेकर, संजय कंचर्लावार, सौ. अनुराधा हजारे, सतिश घोनमोडे, प्रशांत चौधरी, कु. शितल कुळमेथे, राजेंद्र अडपेवार, सौ. छबू वैरागडे, सौ. शितल आत्राम, रवी आसवानी, सौ. पुष्‍पा उराडे, संदीप आवारी, अॅड. राहूल घोटेकर, अंकुश सावसाकडे, चंद्रकला सोयाम, सौ. जयश्री जुमडे, सौ. वनिता डुकरे, सोपान वायरकर, सौ. वंदना जांभुळकर, सौ. सविता कांबळे, सौ. वंदना तिखे आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here