कोकीळा पण आत्ता “कुहू-कुहु” न करता “कोविड-कोविड” करायला लागली आहे!
उद्धव ठाकरे टीव्हीवर दिसत होते, त्या सरकारचा कारभार दिसत नाही!
Lockdown संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे परखड मत!
23 मार्च पासून संपूर्ण देश अदृश्य असलेल्या कोरोना या विषाणू सोबत लढत आहे. या विषाणूने संपूर्ण देशातील बांधवांना घरात बसविलेले आहे. आज हे देशबांधव मानसिक विवंचनेत जगत असून त्यांना बाहेर कसे निघावे लागेल याचा विचार राज्याने करायला हवा. आता हा lockdown उघडायला हवा असे स्पष्ट व परखड मत मनसेचे राज ठाकरे यांनी एबीपी माझा वर दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
आपल्या परखड मतासाठी प्रसिद्ध असलेले राज साहेब ठाकरे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत संपूर्ण महाराष्ट्र वासियांची व देशवासीयांचे मत व्यक्त केले आहे. 135 कोटीच्या देशबांधवांमध्ये दुर्दैवाने काही मृत्यू झालेत, त्यासाठी संपूर्ण देशाला वेठीस धरणे योग्य नाही. देशाने यापुर्वी ही साथ रोग बघितला आहे, फक्त त्यावेळी तो मोजला गेला नाही, असे आपले मत मांडतांनाच त्यांनी कोकीळा पण आत्ता “कुहू-कुहु” न करता “कोविड-कोविड” करायला लागली आहे, या शब्दात त्यांनी कोरोना च्या बाबतीत होत असलेल्या बागुलबुवा वर उपहासात्मक टिका केली.
देशात आणि राज्यात सद्ध्या कोरोना महामारीमुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे याबाबत सरकारने ठोस असा निर्णय घेऊन जनतेला दिलासा देणे आवश्यक असताना राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्यांकडे बोट दाखवतंय, पण लोकांना याविषयी घेणं देणं नाही. लोकांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला यातून सोडवा. उद्धव ठाकरे टीव्हीवर दिसत होते, त्या सरकारचा कारभार दिसत नाहीय, दिसला नाही. कोरोनाबाबत लोकांच्या मनात कमालीची भीती निर्माण झाली आहे, माध्यमांनी देखील ही भीती वाढवली. कोरोनाचा संसर्ग गंभीर आहे, पण त्याचा बाऊ खूप केला गेला. अशा प्रकारचे गंभीर विधान मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी एबीपी माझा या न्यूज ला दिलेल्या मुलाखतीत केले, ते पुढे म्हणाले की मोठ्या घरांचं ठीक आहे पण झोपड्यांमध्ये माणसे कुठून क्वारंटाईन होणार ? लॉकडाऊन उठवण्याचा नक्की आराखडा काय? किती काळ लॉकडाऊनमुळे लोकांची फरफट करणार? हे सरकारने स्पष्ट करायला हवं. आता सगळं सुरळीत करावंच लागेल.कोरोना विषाणूसोबत जगावंच लागेल, असंही राजसाहेब ठाकरे यांनी सांगितले.
कोरोनाचं संकट अभूतपूर्व आहे. पण त्या काळात सरकारवर टीका करण्याची वेळ नव्हती. दोन्ही सरकारच्या चुका झाल्या; पण ती वेळ राजकारण करण्याची नव्हती म्हणून विरोधी पक्षांनी जबाबदारीने वागायला हवं होतं, असं म्हणत राजसाहेब ठाकरे यांनी विरोधकांनाही चिमटा काढला.
राज्यातील महा विकास आघाडी सरकार विषयी विचारले असता ते म्हणाले की राज्यातील तीन पक्षांचं सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही. कारण या तिन्ही पक्षांमध्ये कोणताही संवाद दिसत नाहीय. कुठलाही ताळमेळ जाणवत नाहीय, असं भाकीतही त्यांनी केलं. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राजसाहेब ठाकरे यासंदर्भात पुढं म्हणाले की, ज्या वेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे परस्पर विचारधारेचे तीन पक्ष आले, तेव्हाच हे सरकार फार काळ टिकणार नाही, असं भाकीत मी केलं होतं. कुठल्याही मंत्र्यांचा एकमेकांशी संवाद नाही. सध्याच्या स्थितीत त्यांच्यातील कुरबुरी बघता या सरकारमध्ये कुठलाही ताळमेळ असलेला दिसून येत नाही, असं राजसाहेब ठाकरे यावेळी म्हणाले.