चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे महासचिव राकेश रत्नावार यांची प्रशासनाकडे मागणी !
मुल : सद्यस्थितीत मूल शहराची कोरोना बाधिता़ची संख्या 42 वर पोहोचली आहे. करीता परराज्यातून आलेल्या लोकांना गृह अलगीकरणात न ठेवता
संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात यावे अशा मागणी संदर्भातील पत्र चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे महासचिव, तथा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांनी
उपविभागीय अधिकारी मुल यांना लेखी पत्रामधून केली आहे.
मुल नगरात कोरोना विषाणु महामारीच्या प्रादुर्भावापासून स्थानिक मुलची जनता सावधगीरी बाळगत आहे. आणि मूल येथील स्थानिक प्रशासनही यावर लक्ष केन्द्रीत करुन कोरोनामुक्त शहर ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. त्यामुळे कोवीड-१९ च्या प्रादुर्भावावर नक्कीच आळा बसला असल्याचे मूलच्या नागरीकांनी सुध्दा मान्य केले आहे परंतू परराज्यातील असंख्य लोक काम करण्याच्या हेतूने मुल येथे येत असून बाहेरुन आलेल्या व्यक्तीपासूनच कोरोनाचा संक्रमण वाढत असल्याचे दिसून येत आहे. परप्रांतीय राज्यामधून आलेल्या
मजुरांपैकी बरेच रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह बाधीत निधाल्याने मूल शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, करीता बाहेरुन आलेल्या लोकांची तात्काळ आरोग्य तपासणी करण्यात यावी व अशा कोणालाही गृह अलगीकरणात न ठेवता
संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात यावे तसेच रॉईसमिल मध्ये काम करणाया परप्रांतीय मजूरांना त्वरीत रोखण्यात यावे अशी मागणी पत्रामधून केली आहे. तसेच कोरोनाची वाढते रुग्ण लक्षात घेता परप्रांतीय राज्यामधून आणि रेडझोनमधून येणा-यांना सुध्दा जिल्हास्तरावरुन रोखण्यात यावे, कोणालाही परवानगी देण्यात येऊ नये असेही पत्रामध्ये काँग्रेसचे जिल्हा महासचिव व नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष राकश रत्नावार यांनी पत्राव्दारे मागणी केली आहे.