Wednesday, March 22, 2023
HomeLatest News◼️ काव्यरंग :- जगणं

◼️ काव्यरंग :- जगणं

◼️ खुप मस्त कविता… कोणी लिहिली माहित नाही पण ज्याने लिहिली त्याला सलाम…. नक्की वाचा…

�� जगणं ��

आयुष्यभर सोबत असून,
जवळ कधी बसत नाही.
एकाच घरात राहून आम्ही,
एकमेकांस दिसत नाही.

हरवला तो आपसांतला,
जिव्हाळ्याचा संवाद.
एकमेकांस दोष देऊन,
नित्य चाले वादविवाद.

धाव धाव धावतो आहे,
दिशा मात्र कळत नाही.
ह्रदयाचे पाऊल कधी,
ह्रदयाकडे वळत नाही.

इतकं जगून झालं पण,
जगायला वेळ नाही.
जगतो आहोत कशासाठी,
कशालाच कशाचा मेळ नाही.

क्षण एक येईल असा,
घेऊन जाईल हा श्वास.
अर्ध्यावरच थांबलेला,
असेल जीवन प्रवास.

अजूनही वेळ आहे,
थोडं तरी जगून घ्या.
सुंदर अशा जगण्याला,
डोळे भरून बघून घ्या.

            ◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments