Wednesday, February 8, 2023
Homeसाहित्य :- कथा / कविता◼️ लघुकथा :- आई आणि बायको..

◼️ लघुकथा :- आई आणि बायको..

🔴 आई आणि बायको…

बायको सतत आईवर आरोप करत होती……….

आणि नवरा सतत तिला आपल्या मर्यादेत राहन्यास सांगत होता..

पणबायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती. ती जोरजोरात ओरडून सांगत होती..

“मी अंगठी टेबलवरच ठेवली होती
आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच् आलेलं नव्हतं..
अंगठी असो वा नसो ती आईनेच उचललीये”

गोष्ट जेव्हा पतिच्या सहनशक्तिच्या बाहेर गेली..
त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेऊन दिली..

तिन महिन्या पूर्वीच लग्न झालेलं होतं..पत्नीला ती चापट सहन झाली नाही. ती घर सोडून चालली आणि जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला….

कि तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का??

तेव्हा पति ने उत्तर दिले…

त्या उत्तराला ऐकून
दरवाजा मागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले..

पति ने पत्नी ला सांगितले..

“जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले. आई अजुबाजूच्या परिसरात झाड़ू मारुन थोड़े पैसे आनायची ज्यात एक वेळेचं

पोट भरायचं.

आई एका ताटात भाकर वाढायची आणि रिकाम्या डब्याला झाकुन् ठेवायचि आणि म्हणायची माझ्या भाकरी या डब्यात आहेत बाळा तू खा. मी पण नेहमी अर्धी भाकर खाऊन म्हणायचो आई माझं पोट भरलय आता मला नाही खायचं.

आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालन पोषण केलं आणि मोठं केलं. आज मी दोन भाकरी कमवायच्या लायकिचा झालो पण हे कसं विसरु की आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं,

ती आई या स्तिथिला अशा अंगठी साठी भुकेलि असेल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही..तू तर तिन महिन्यापासूनच माझ्या सोबत आहे.

मी तर आईच्या तपश्चर्यला 25 वर्षापासून बघितलय. 😔हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रु आले. ति समजूच् शकत नव्हती की मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेड़तोय की ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज….◼️

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments