आमदार सुधीर मुनगंटीवारांच्या नेतृत्वात पदवीधर मतदार नोंदणी ला सुरवात
संघटनेच्या बळावर निवडणूक जिंका….आ. प्रा.अनिल सोले
चंद्रपूर, लोकनेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपुर जिल्ह्यातील पदवीधर मतदारांची नोंदणी सुरू झाली आहे.त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि सूक्ष्म नियोजनाची जोड या अभियानाला मिळाल्याने कार्यकर्ते उत्साहात आहे.आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संघटन कौशल्यामुळे नोंदणी सर्वाधिक होऊन भाजपा ही निवडणूक जिंकेल असे प्रतिपादन आ.प्रा.अनिल सोले यांनी केले.
ते पदवीधर मतदार नोंदणी अभियान चे चंद्रपुर महानगर संयोजक ,नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार यांचे जनसंपर्क कार्यालयात आयोजित बैठकीत आज रविवार (१२)जुलै ला बोलत होते.
यावेळी महापौर राखी कंचर्लावार,भाजपा जिल्हाध्यक्ष (शहर)डॉ मंगेश गुलवाडे,रमेश दलाल यांची मंचावर उपस्थिती होती.
आमदार सोले म्हणाले,२०१४ मध्ये या जिल्ह्यात ३८ हजार मतदार नोंदल्या गेले,त्यामुळे या जिल्ह्यात आणखी भरपूर काम केले जाऊ शकते.संघटनेच्या बळावर संकल्प करून नोंदणी करा.कोरोनाच्या काळात स्वतःला व परिवाराला सुरक्षित ठेवूनच कार्य करा,अश्या सूचनाही त्यांनी केल्या.
यावेळी नवंनियुक्त भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ गुलवाडे यांचा आ.सोले व सुभाष कासंगोट्टूवार यांचे हस्ते आ सुधीर मुनगंटीवार यांची सुंदर प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी आ सोले याना आर्सेनिक अलबम ३० या औषधाचे एक ५० बॉटल चे पॅकेट देऊन स्वागत करण्यात आले.या प्रसंगी सुभाष कासंगोट्टूवार आणि यश बांगडे यांनी अहवाल सादर केला. डॉ गुलवाडे यांनी आत्मविश्वास महत्वाचा सांगितले.
बैठकीचे संचलन पदवीधर मतदार नोंदणी सहसंयोजक प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले तर,प्रज्वलंत कडू यांनी आभार मानले.बैठकीला प्रामुख्याने दत्तप्रसंन्न महादानी,प्रकाश धारणे,सूरज पेदुलवार,संजीव श्रीरामवार, विजय सराफ,राहुल धोटेकर,डॉ दीपक भट्टाचार्य,राहुल ताकधट, डॉ सरबेरे,ऍड सरिता समदूरकर,प्रज्ञा बोरगंमवार,मंजूश्री कासंगोट्टूवार,प्राचार्य गोजे,संदीप आगलावे ,नितीन गुप्ता,राकेश बोमंवर ,धवल चावरे ,कुणाल गुंडावर ,धर्माजी खंगार , डॉ. मनोज कुपरणे , साईनाथ उपरे,राजेंद्र खांडेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.◼️