◼️आजचे राशिभविष्य ; 8 जुलै 2020
1. मेष : नातवंडांमध्ये मन रमेल. अकारण चिंता केल्यास प्रकृतीस्वास्थ्य बिघडेल. आत्मविश्वास व सकारात्मकतेमुळे मोठी मुसंडी माराल.
2. वृषभ : प्रलंबित कामे चिकाटीने पूर्ण कराल. पैसे खर्च करताना सारासार विचार करणे आवश्यक राहील.
3. मिथुन : सहजीवनात आनंदाचे क्षण येतील. जोडीदाराचे नवे रूप पाहायला मिळेल. कमी लेखणाऱ्यांपासून दूर राहा.
4. कर्क : नोकरी-व्यवसायात ताणाची स्थिती राहील. मिळालेला वेळ सत्कारणी लावा. उत्तरार्धात आनंदाची बातमी कानी येईल.
5. सिंह : आप्तेष्टांमध्ये असलेले वाद संपुष्टात येतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.
6. कन्या : आर्थिक गुंतवणूक करताना ज्येष्ठ व्यक्तींशी बोला. त्यांचा सल्ला फायदेशीर ठरेल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.
7. तूळ : विनाकारण वाद छेडू नका. भावना ताब्यात ठेवा. ध्यान अथवा योगा केल्यास मानसिक ताण नियंत्रणात राहील.
8. वृश्चिक : हाती घेतलेले कार्य सिद्धीस जाईल. व्यवसायातील अनुभवी लोकांचा सल्ला मिळू शकेल.
9. धनु : प्रयत्न, चिकाटी आणि आशीर्वाद या त्रिसूत्रीमुळे व्यवसायात यशस्वी व्हाल. कायदेशीर कागदपत्रे पडताळून घ्या.
10. मकर : वैवाहिक आयुष्यात इतरांची ढवळाढवळ सहन करू नका. मनाची द्विधावस्था होऊ देऊ नका.
11. कुंभ : प्रतिष्ठीत व्यक्तिमत्त्वांची भेट होईल. बहिणीसाठी आर्थिक तजवीज करावी लागेल. प्रतिकूल दिवस.
12. मीन : मानसिक ताण घालविण्यासाठी वाचन करा. व्यवसायानिमित्त केलेली गुंतवणूक योग्य परतावा देईल.