जिवती :
पाटागुडा
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सरकार दरबारी मांडून न्याय मिळवून देणारे राज्यमंत्री , शेतकरी, गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणारे, दिव्यांग बांधवांचे कैवारी, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज जिवती तालुक्यातील पातागुंडा येथे प्रहार सणघटनेचे जीवन तोगरे,व बाळ गोपाळ यांनी वृक्षारोपण केले
देशामध्ये कोरोनाचे संकट असून सामान्य जनता आर्थिक तथा मानसिक परिस्थिती ने हतबल झाली आहे. कोरोनाच्या संक्रमणाच्या काळात परिस्थिती गंभीर असून मा. बच्चू कडू यांच्या सूचनेनुसार वाढदिवस उत्साहात साजरा न करता प्रत्येकानी एक वृक्ष लावून साजरा करण्याचे आवाहन केले. मा बच्चू कडू यांचे 5 लक्ष वृक्ष लागवडीच्या संकल्पनेतून आज जिवती तालुक्यातील पाटागुडा येथे प्रहार सेवकांनी वृक्ष लावून वाढदिवस साजरा करण्यात आला..