बल्लारपूर: अक्षय भोयर (ता.प्र)
बल्लारपूर: तालुक्यात सावकाराचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे . हे सावकार सर्व सामान्य नागरिकांना नियम बाह्य जादा व्याज दराने पैसे देऊन त्यांची लुट करत आहे काही सावकार महिन्याला व्याज घेतात तर काही सावकार आठवडल्या व्याज घेतात , तर काही सावकार घर, सोनं किंवा दागिने, जमीन, गाड्या,तर काही, शेती गहाण ठेवून, सर्व सामान्य जनतेच्या जीवाशी खेडत आहे. एखाद्या कर्जदारकडून एखाद्या महिन्याला व्याज जर चुकतं झाले नाही तर व्याजाचे व्याज वसूल करण्याचे काम सावकाराकडून सुरू आहे ,अश्या अवैध सावकारांची माहिती पोलीस प्रशासनला सुद्धा आहे , आणि काही पोलीस कर्मचारी व राजकारणी, सुद्धा या व्यवसायात सहभागी आहे , आपल्या पदाचा गैर वापर करून जनतेशी जबरण लुट करीत आहे अश्या अवैध सावकारी कडे प्रशासनाने लक्ष द्यावे आणि अवैध सावकारांवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांकडून येत आहे