चंद्रपूर:
भाजपाचे नवनियुक्त चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) अध्यक्ष देवराव भोंगळे आणि चंद्रपूर महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांचे आज माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुष्पगुच्छ आणि पुस्तक देत स्वागत केले व त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
देवराव भोंगळे आणि डॉ. मंगेश गुलवाडे यांनी आज माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत त्यांचा आशिर्वाद घेतला. आ. मुनगंटीवार यांनी त्यांचे बांबुपासून तयार करण्यात आलेली तलवार, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारीत पुस्तक आणि पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. संघटन हा पक्षाचा आत्मा असून संघटनवाढीसाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करणयाची मोठी जबाबदारी दोन्ही अध्यक्षांवर आली असून यापुढील प्रत्येक क्षण संघटनेसाठी देण्याचा संकल्प करत चंद्रपूर जिल्हा पक्षसंघटनेच्या पातळीवर अग्रणी जिल्हा ठरावा यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी, असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी देवराव भोंगळे आणि डॉ. मंगेश गुलवाडे यांना केले. बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा यांची भाजपाच्या प्रदेश कार्यसमिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचेही आ. मुनगंटीवार यांनी स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, महापौर सौ. राखी कंचर्लावार, नगरसेवक संदीप आवारी, संजय कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, सुभाष कासनगोट्टूवार, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, काशी सिंह, रवि आसवानी, गजानन गोरंटीवार, अल्का आत्राम, रोशन ठेंगणे, अजय मस्की, तुळशिराम रोहणकर, निलेश चिंचोळकर, अमोल मोरे, नामदेव डाहूले, प्रेम चिवंडे, राहूल पावडे, संजय तिवारी, राजकुमार गोडसेलवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती हो