चंद्रपूर :
तीन महिन्यापासून कोरोनामुळे लॉकडाऊन आल्यामुळे सर्वत्र बससेवा बंद होती. माजरी येथील शेतकऱ्यांना बी – बियाणे आणण्यासाठी वरोरा – भद्रावती किंवा चंद्रपूर येथे जावे लागतात. माजरी येथे बसेस येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हि माहिती खासदार बाळू धानोरकर यांना कळताच तत्परतेने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगून हि बससेवा सुरु केली.
शेतकऱ्यांना बी – बियाणे आणण्यासाठी बससेवा उपलब्ध नसल्यामुळे खाजगी वाहनांच्या आधार घ्यावा लागत होता. त्यात यांची मोठी आर्थिक लूट होत होती. माजरी परिसरातील नागरिकांना खिशाला कात्री बसत होती. शेतकऱ्यांची समस्या खासदार बाळू धानोरकर यांच्या कडे आली. त्यावर संबंधित अधिकारण्या त्यांनी हि बससेवा सुरु करण्याचे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेत हि बससेवा सुरु केली. या बससेवेच्या सेवेमुळे परिसरातील गावातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांनी खासदार बाळू धानोरकर यांचे विशेष आभार मानले आहे.