Wednesday, March 22, 2023
Homeराज्यमराठवाडाअफवांवर विश्वास ठेऊन वृत्तपत्र घेणे बंद करू नका: बालाजी पवार

अफवांवर विश्वास ठेऊन वृत्तपत्र घेणे बंद करू नका: बालाजी पवार

प्रिय वाचक, वर्गणीदार
#नमस्कार
‌ मी तुमचा वृत्तपत्र विक्रेता, चुकलंच मी तुमचा #पेपरवाला उगाच वृत्तपत्र विक्रेता हा शब्द वापरुन माझ्या मनाचं समाधान कशाला करुन घेऊ. जे तुम्ही म्हणता तोच
#मी_पेपरवाला…
सध्या कोरोना व्हायरसच्या भितीमुळे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पेपर घेणं बंद केलं आहे, कोणीतरी अफवा पसरवायला मेसेज , व्हिडिओ टाकतो आणि सगळे त्यावर विश्वास ठेवून पेपर बंद करतात.
वास्तविक बऱ्याच तज्ञ डॉक्टरांनीही पेपर मुळे कोरोना व्हायरस पसरतो हि अफवाच आहे, असे सांगितले आहे. पण त्याची दखल कोणीही घेत नाही. वृत्तपत्रा (पेपर) मुळे कोरोना होतो हे अजुनही सिध्द झालेले नाही.
जशी भिती तुम्हाला कोरोनाची आहे ती भिती आम्हालाही आहे. आमच्या घरीपण जेष्ट नागरिक, लहान मुले आहेत त्यांच्यासाठी तुमच्यासाठी आम्ही सर्व आवश्यक ती काळजी घेतो.
पेपर टाकताना आम्ही तुमचे दरवाजे, ग्रील याला स्पर्श न करता पेपर अडकवतो.तुम्हीच खोलवर जाऊन विचार करा कि आपला पेपरवाला आपण किती वेळा पाहिला आणि तो आपल्या किती वेळा संपर्कात आला. आता बऱ्यापैकी सगळीकडे लॉकडाऊन उठवल गेलं आहे. सगळे कामावर, वेगवेगळ्या दुकानात किराणा, भाजी तसेच इतर आवश्यक पदार्थ आणण्यासाठी जात असतीलच ना तेव्हा कोरोनाचा धोका नसतो का ?
बघायला गेलं तर फक्त ५ रुपयात आपल्या जिह्यातील शहरातील , देशातीलच नाही तर जगातील विविध बातम्या , खरी माहिती आपल्याला खात्रीशीर पेपर मधुन मिळते. तुमचा पेपरवाला जे लिहीलं आहे ते जसेच्या तसे कोणत्याही प्रकारची भेसळ न करता आपल्या पर्यंत भरल्या सकाळी पोहोचवतो.
कृपया अफवा पसरुन आपल्याच माणसांचा संसार उद्धस्त करु नका. आम्ही केवळ आणि केवळ सत्यच तुमच्या पर्यत पोहचवितो.
शेवटी ग्राहक राजा सर्वस्वी निर्णय तुमचाच.
धन्यवाद 👏 👏
#आपलाच_पेपरवाला

अफवांवर विश्वास ठेऊन वृत्तपत्र घेणे बंद करू नका.
पेपर विक्रेत्याचे कळकळीचे आवाहन सोशल मिडियात व्हायरल होत आहे.
कोरोना काळात अनेक उद्योग, व्यवसायांप्रमाणेच वृत्तपत्र व्यवसायावरही परिणाम झाला आहे. विशेषतः वृत्तपत्रापासून करोना संसर्ग होईल या पूर्णतः अनाठायी भीतीमुळे अनेकांच्या घरी सकाळी येणारे वृत्तपत्र घेणे बंद केले आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्य पेपर विक्रेत्यांवर झाला आहे. ऊन, वारा, पाऊस काहीही असले तरी भल्या सकाळीच ताजे वर्तमानपत्र घरोघरी पोहोचवण्याचे काम विक्रेते करीत असतात. यापार्श्वभूमीवर सध्या या विक्रेत्यांवर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या सोशल मिडियावर एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. यात एका पेपरवाल्याने आपल्या भावना व्यक्त करून समाजाला आवाहन केले आहे. वृत्तपत्रापासून संसर्ग होतो या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे कळकळीचे आवाहन या पोस्टमध्ये आहे.

#बालाजी_पवार
#सरचिटणीस
#महाराष्ट्र_राज्य_वृत्तपत्र_विक्रेता_संघटना

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments