*तेलंगाना येथे उभारण्यात येत असलेल्या इंडस्ट्रीयल कॉरीडॉरमध्ये चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली जिल्ह्यांच्या समावेश करण्यात यावा*
*आमदार किशोर जोरगेवार यांची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना मागणी*
तेलंगाना राज्य सरकारने केंद्र शासनाच्या मदतीने महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागाला लागून इंडस्ट्रीयल कॉरीडॉर उभारण्याची प्रक्रिया सुरु केली आहे त्यामुळे या कॉरीडॉर अंतर्गत येत असलेल्या तेलंगानातील जिल्हांच्या विकासाला चालना मिळणार आहे. हि बाब लक्षात घेत तेलंगाना राज्याच्या सिमेला लागूण असलेल्या चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या जिल्हांच्या विकासासाठीसुध्दा सदर प्रकल्पात या तिन जिल्हांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना केली आहे.
तेलंगाना सरकारने केंद्र शासनाच्या सहकार्याने तयार केलेला इंडस्ट्रीयल कॉरीडॉरचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. तेलंगाना सरकारने ह्या इंडस्ट्रीयल कॉरीडॉरचे प्रेझेन्टेशन सादरीकरणाचा टप्पाही पूर्ण केलेला आहे. हा प्रकल्प आता अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या कॉरीडॉरमूळे यात समाविष्ट असलेल्या करीमनगर, आदिलाबाद व निजामाबाद येथे मोठ्या प्रमाणात उद्योग सुरु होणार आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर, वर्धा आणि गडचीरोली हे महाराष्ट्रातील जिल्हे देखील तेलंगाणाच्या सिमा लगत आहे. त्यामूळे महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या सहाय्याने चंद्रपूर वर्धा व गडचिरोली ह्या तीन जिल्ह्यांचा समावेश या कॉरीडॉरमध्ये केल्यास या जिल्हांमध्ये देखील उद्योगांना चालना मिळू शकते त्यामूळे आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त, मागासलेल्या जिल्ह्यांचा विकास जलद गतीने करता येईल असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. सध्या बेरोजागारीचे संकट या जिल्ह्यांवर आहे. त्यात कोरोनामूळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. अशात या कॉरीडॉरमध्ये या तिन जिल्हाचा समावेश झाल्यास रोजगारनिर्मीही मोठया प्रमाणात होईल असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी असून या तीन जिल्ह्यांचा सदर कॉरीडॉरमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी केली आहे. या मागणी संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली असून त्यांच्याशी चर्चा करत सदर मागणीचे निवेदन त्यांना दिले आहे.