Home कोरोना बल्‍लारपूर ग्रामीण रूग्‍णालयासह सर्व प्राथमिक आरोग्‍य केंद्रात ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण

बल्‍लारपूर ग्रामीण रूग्‍णालयासह सर्व प्राथमिक आरोग्‍य केंद्रात ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण

0

*बल्‍लारपूर ग्रामीण रूग्‍णालयासह सर्व प्राथमिक आरोग्‍य केंद्रात ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण*

बल्लारपूर: विषाणूच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर जेव्‍हापासून लॉकडाऊन सुरू झाले तेव्‍हापासून भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातुन आम्‍ही मदतकार्य सुरू केले आहे. प्रारंभीच्‍या काळात भोजनाचे डबे, धान्‍य व जीवनावश्‍यक वस्‍तुंच्‍या किट्स, सॅनिटायझर, मास्‍क, डेटॉल साबण आदींचे वितरण, पोलिसांसाठी, पोस्‍टमन, सलुन व्‍यावसायिक यांच्यासाठी सुरक्षा किट अशा विविध माध्‍यमातुन आम्‍ही नागरिकांना सहकार्य करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. आज बल्‍लारपूर येथील ग्रामीण रूग्‍णालयात ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण करण्यात आले बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व ग्रामीण रूग्‍णालये व प्राथमिक आरोग्‍य केंद्रांमध्‍ये ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन नागरिकांच्‍या सेवेत रूजु करण्‍यात येत आहे. यासोबतच 50 लीटर सॅनिटायझर दिले असून ते संपल्‍यानंतर पुन्‍हा देण्‍यात येतील. या काळात डॉक्‍टर्स, परिचारीका, सफाई कर्मचारी, नगर परिषदेचे कर्मचारी, पोलिस बांधव, महसुल विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोना योध्‍दा म्‍हणून केलेले कार्य निश्‍चीतच कौतुकास्‍पद आहे, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले या लोकार्पण सोहळ्याला भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा महिला आघाडीच्‍या जिल्‍हाध्‍यक्षा सौ. रेणुका दुधे, काशी सिंह, मनीष पांडे, रणंजय सिंह, अजय दुबे, राजू गुंडेट्टी, आशिष देवतळे, वैशाली जोशी, हेमा डंभारे, घनश्‍याम बुरडकर, महेंद्र ढोके यांच्‍यासह नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी विपीन मुद्द, डॉ. अर्पीता वावरकर आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होत
चंद्रपूर जिल्‍हयात नागरिकांमध्‍ये एक लाख मास्‍क वितरण करण्‍याचा आपण संकल्‍प केला असून जिल्‍हयातील एक लाख परिवारापर्यंत आर्सेनिक अल्‍बम 30 या होमिओपॅथीक गोळया सुध्‍दा पोहचविण्‍याचे नियोजन आम्‍ही केले आहे. केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी 550 पीपीई किट उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत. कोरोनाच्‍या या जागतीक महामारीत गरजू व गरीब नागरिकांना मदतीचा हात देताना नागरिकांच्‍या आरोग्‍याची काळजी सुध्‍दा आम्‍ही घेत आहोत. सॅनिटायझेशन, मास्‍क आणि सोशल डिस्‍टंसींग अर्थात SMS या सुत्रानुसार आमचे सेवाकार्य सुरू असल्‍याचे आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here