बल्लारपूर – राज्यात विविध पिकांच्या बोगस प्रतीच्या बियाणांची विक्री झालेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अशा बोगस बियाणांची विक्री झाली होती.कृषि पदवीधर संघटनेचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष वैभव मते व चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष आकाश खोब्रागडे यांचा मार्गदर्शनात बल्लारपूर तालुका अध्यक्ष शुभम शेटिये, उपाध्यक्ष रोशन डोबाला यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भेट दिली व झालेल्या नुकसानाची पाहणी केली.झालेल्या नुकसानाची सर्व माहिती घेऊन बल्लारपूर तालुका पदाधिकारी बल्लारपूर तालुका कृषि अधिकारी चव्हाण यांना माहिती दिली ,व संघटनेकडून त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.
कृषि विभागाने वेळीच बियाणे तपासणी करावी व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच फसवणूक केलेल्या खाजगी कंपन्यावर कार्यवाही करावी,व नुकसान भरपाई म्हणून खाजगी कंपन्यांकडून शेतकऱ्यांना चांगले व उच्च प्रतीचे बियाणे व शेतकऱ्यांचे पैसे परत करावे हे या निवेदना च्या माध्यमातून कृषि पदवीधर संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी मागणी केली.कृषि पदवीधर संघटना आज विदर्भात शेतकरी व युवकांसाठी काम करत आहे.गेले आठ वर्षांपासून संघटना प्रमुख कृषिभूषण महेश कडूस पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत आहे. संघटने मधे आज विदर्भ युवक विद्यार्थी शेतकरी पुत्र जोडला जात आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून त्यांच्या हृदयात स्थान मिळवणे एवढेच संघटनेचे उदिष्ट आहे.
कृषि पदवीधर संघटने तर्फे कृषी अधिकारी यांना निवेदन*
Leave a comment