चंद्रपूर – 17 जूनला बनावट कागदपत्रांच्या आधारे वेकोली मध्ये नोकरी लावून देणारी 5 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती त्यानंतर पुन्हा रामनगर पोलिसांनी चांदा रैयतवारी कॉलरी येथे वर्ष 1985 पासून बनावट कागदपत्र सादर करून नोकरी मिळविणाऱ्या राजय्या याला अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यात बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता काही भामटे बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवीत पैसे उकळत आहे, शासनाच्या कोणत्याही विभागात आपण तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी लावून देतो असे आश्वासन बेरोजगारांना देण्यात येते, त्या आमिषाला बेरोजगार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बळी पडले आहे.
सध्या सर्वात जास्त चर्चा ही वेकोली मध्ये बनावट कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवींऱ्यांची आहे, अजून असे किती नोकरदार बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी करीत आहे हे आता स्थानिक गुन्हे शाखा व पोलिसांच्या चौकशीनंतर समजणार.
परंतु इतके वर्ष लोटून सुद्धा वेकोलीच्या अधिकाऱ्यांना काही माहीत नाही असे होऊ शकत नाही, अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय असे काम होत नाही त्यामुळे वेकोली मधील अश्या लोकांच्या टोळीवर सुद्धा नियंत्रण आणणे गरजेचे आहे.