कोसारा येथील रस्त्याची दैनावस्था
रस्त्याची दुरूस्ती करण्याची माजी उपसरंपच दिनेश चिंचोलकर यांची मागणी
चंद्रपूर : शहरातील लगतच्या कोसारा येथील रस्त्यावर नुसती गिटट्टी टाकून रस्ता बनविल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सदर रस्ता हा कोसारा गावाकडील दिशेने जात असून अन्य मार्गाकडे जाण्यासाठी सदर रस्त्याचा वापर होतो.मात्र गेल्या कित्येक दिवसापासून सदर रस्त्यावर नुसते गिट्टी टाकून ठेवल्याने यावर अनेक छोटे मोठे अपघातही घडले आहे.याकडे साबां विभागाचे दुर्लक्ष होत आहे. दुचाकी वाहन चालवितांना या रस्त्यावर कमालीची कसरत करावी लागते. तर रात्रीच्या सुमारास सदर रस्त्यावर अपघात घडण्याची शक्यता निर्माण होत आहे. या अगोदर रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले होते. आता मात्र त्यावर गिट्टीचा मुलामा देवून रस्ता थंडबस्त्यात पडला असून सदर रस्ता त्वरीत दुरूस्त करण्यात यावी अशी मागणी कोसाराचे उपसरपंच दिनेश चिंचोलकर यांनी एका पत्रकातून केली आहे.
कोसारा येथील रस्त्याची दैनावस्था
RELATED ARTICLES