#ताडोबा_बफर_झोन_सिमेला_लागून_असलेला_कोळसा_ब्लॉक_लिलाव_रद्द_करण्यासाठी_मनसेचे_आंदोलन !
वाघाचे भ्रमणमार्ग बंद होऊन जंगलातील वन्यप्राण्याचा नाश होण्याची भीती !
चंद्रपूर जिल्हा हा औधौगिक जिल्हा असला तरी तो वनसंपदेनी नटलेला व ताडोबा अभ्ययरण्यामुळे भारतातील पर्यटकांना मोहित करणारा जिल्हा म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. पण केंद्र शासनाची या अभयारण्याकडे वक्रद्रुष्टी नेहमीच पर्यावरण व प्रेमींसाठी डोकेदुखी ठरत आहे. सन २०१० मधे तत्कालीन काँग्रेस सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात दोन कोळसा ब्लॉक मंजूर केले होते. त्यामधे लोहरा जवळ व चिमूर जवळील बंदर शिवापूर परिसरात असे दोन कोळसा ब्लॉक विरोधात आंदोलने झाली त्यामुळे तात्कालिन केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी त्या कोळसा ब्लॉक मंजुरी मिळू दिली नाही. मात्र आता तब्बल १०त् वर्षानंतर मोदी सरकार जे उद्योगपतीसाठी काम करते त्या सरकारनी जुनी फाईल उघडून नव्याने बंदर कोळसा ब्लॉक चा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याने केंद्र शासनाच्या या लिलावाला मनसे तर्फे तीव्र संताप व्यक्त करून बंदर शिवापूर शिवारात निदर्शने करण्यात आले . या आंदोलनात केंद्र सरकार मुर्दाबाद आणि वाघ वाचवा. जंगल वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या
ताडोबाच्या बफर सिमेस लागून बंदर कोळसा ब्लॉक लीलाव रद्द करण्यात यावे या मागणी करिता वेगवेगळे आंदोलन करण्यात येत आहे. मात्र मनसेचे हे प्रत्यक्ष कोळसा ब्लॉक स्थळावर आंदोलन चर्चेचा विषय बनला असून मनसे तर्फे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावड़ेकर यांना लीलाव रद्द करण्या संदर्भात निवेदन देवून केंद्र सरकारचा हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी #मनवीसे_जिल्हाध्यक्ष_राहुल_बालमवार यांनी केली आहे.
या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष नगरसेवक सचिन भोयर,जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कोल्हे,जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, शहर अध्यक्ष मनदिप रोडे,महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड.ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे,तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर,कुलदीप चंदनखेडे,मनोज तांबेकर, नितीन पेंदाम, महेश शास्त्रकार,करण नायर. नितीन टेकाम,अक्षय चौधरी,राकेश पराडकर व इतर मनसैनिक उपस्थित होते.