बारावीचा निकाल आज गुरुवार ला होणार जाहीर

0
71

बारावीचा निकाल आज होणार जाहीर

पुणे : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा अर्थात इयत्ता १२ वी निकाल आज गुरूवार १६ जूलै रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.

राज्यातील कोरोनाच्या संकटामुळे सुरू असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचे म्हणजेच १२ वी परीक्षेचा निकाल केव्हा लागणार याकडे विद्यार्थ्यासह पालकांचे लक्ष लागले होते.मात्र १२ वीचा निकाल आज गुरूवार १६ जूलै रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्याची धाकधुक वाढली आहे.मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.त्याचा तपशील आज मंडळाने जाहीर केला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई,कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उद्या गुरुवारी दिनांक १६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

◼️हा निकाल मंडळाच्या पुढील अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.

१. www.mahresult.nic.in

२. www.hscresult.mkcl.org
३. www.maharashtraeducation.com
परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुनउपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आर.)घेता येईल .www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयाथ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस बसलेल्या झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-hsc.ac.in स्वतः किंवा शाळा,कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी,शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शुक्रवार १७ जूलै ते सोमवार दिनांक २७ जूलै पर्यंत व छायाप्रतीसाठी शुक्रवार, १७ जूलै ते बुधवार, दिनांक ५ ऑगस्ट पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/Credit Card/ UP/ Net Banking) याद्वारे भरता येईल,

उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क करावा,फेब्रुवारी-मार्च २०२० च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्याथ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी,गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील असेही मंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.◼️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here