साकेत बचावसाठी धरने आंदोलन

0
4
वरोरा ता.२२ : बुद्धिष्ट  इंटरनॅशनल नेटवर्क चंद्रपुर जिल्ह्याच्या वतिने साकेत बचावो, विरासत बचावो संदर्भात वरोरा तालुक्यातील विहारामध्ये मास्क लावून धरने आंदोलन करुन महामहिम राष्ट्रपती यांना तहसीलदार यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.
  सदर निवेदन नमुद करण्यात आले आहे की, सध्या सरकारने लॉकडाऊन लागू केलेले होते. अशा परिस्थितीत जनता घरात असल्याचा फायदा घेत उत्तर प्रदेश सरकारने अयोध्या (मुडचि पुर्वीची साकेत नगरी) उत्खनन केले. ते सर्व कायद्याच्या दृष्टिने अवैध होते. अशाही परिस्थितीत त्या ठिकाणी तमाम बहुजानांची विरासत बुद्धांच्या मूर्ती आणि स्तूप, विविध बुद्ध अवशेष निघाले असे असतांना निघलेले अवशेष नष्ट करण्याचा प्रयत्न सदर सरकार करत आहे.
    भारत ही बुद्धांची भूमि आहे आणि हे सरकार भारतातील बुद्धांचे अवशेष नष्ट करतात अशा सरकारचा बुद्धिष्ट  इंटरनॅशनल नेटवर्क जाहिर निषेध करते.
     सदर निवेदन चंद्रपुर जिल्ह्यातून , वरोरा,भद्रावती,चंद्रपुर,नागभीड, गडचांदुर,सिंधेवाही इत्यादि तालुक्यातून महामहिम राष्ट्रपती यांना पाठविन्यात आले.
      यावेडेस निवेदन सादर करतांना नेतृत्व मा. कांबळे साहेब, राहुल बौद्ध, भागवत माँडम, मोरेश्वर डोंगरे, राजेंद कांबळे, संजय मेश्राम, मुंजनकर माँडम,डाँ.नगरळे  साहेब इत्यादिनी नेतृत्व केले.
Attachments area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here