शरद पवार विचार मंच तर्फे पेट्रोल डिझेल दरवाढीचा विरोध

0
3
चंद्रपूर:   लोकराजे शाहू महाराज यांची जयंती निमित्य विनम्र अभिवाद
या पावनदिनी ,गांधी चौक चंद्रपूर इथे शरद पवार विचार मंच तर्फे मागील 17 दिवसापासून पेट्रोल-डीझेलची सातत्याने  होणाऱ्या दरवाढ विरोधात अहिंसा व शांततेच्या मार्गाने निर्देशने करण्यात आली।  त्या अगोदर मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मा.जिल्हाधिकारी, चंद्रपूर  मार्फत निवेदन पाठविण्यात आले.अगोदरच कोरोनामुळे लोकांचे रोजगार हिरावले,,  जिवन जगणे कठीण झाले असून , केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाने पेट्रोल-डीझेल दरवाढ होत असून त्याचा परिणाम जीवनाशयक वस्तूंच्या किंमतीत दरवाढ होत असून त्याचा  त्रास लोकांना  सहन करावा लागतोय.या विरुद्ध आज शरद पवार विचार मंच जिल्हा चंद्रपूर तर्फे  पेट्रोल-डीझेलमध्ये झालेली दरवाढ मागे घ्यावी, सरकारने केंद्रीय कर पेट्रोल डिझेलचा कमी करावा, अश्या प्रकारची निदर्शने पोस्टर च्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत देशकर, जिल्हाध्यक्ष निमेश मानकर,संजय तुरीले, प्रभाग अध्यक्ष शुभम प्रजापती व इतर नागरिक उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here