वैनगंगेच्या पुलावरून उडी घेतल्याने रानगव्याचा मृत्यू

0
310

 

सावली (तालुका प्रतिनिधी)

चंद्रपुर- गडचीरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली तालुक्यात असलेल्या वैनगंगा नदीच्या पुलावरून रानगव्याने उडी घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना रात्री तीन वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार रात्री तीन वाजताच्या सुमारास रानगवा अगदी वैनगंगा नदीवरील पुलाच्या मध्यभागी उभा असताना दोन्ही बाजुने चार चाकी वाहन आले. दोन्ही चालकांनी आपापले वाहन दुरवरच उभे केले होते. तरीही रानगव्याने घाबरून वैनगंगेच्या पुलावरून उडी घेतल्याचे बोलले जात आहे. साधारणतः शंभर फुटांपेक्षा जास्त अंतरावरून उडी घेतल्याने तो रानगवा जागेवरच गतप्राण झाला असल्याचे समजते. घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनानंतर रानगव्याला नदीतच पुरण्यात आले. पुढील तपास सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत कामडी यांच्या मार्गदर्शनात सावली चे क्षेत्रसहाय्यक राजु कोडापे व्याहाड खुर्द चे क्षेत्रसहाय्यक रवी सुर्यवंशी व ईतर कर्मचारी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here