महिला काँग्रेस द्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

0
27

राजुरा

“स्त्री मुक्ती दिन “* ज्यांनी स्त्रियांबद्दल “चुल आणि मुल” ही भावना मोडीत काढत स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. स्रियांना सन्मानाचे जीवन मिळवुन दिले. ज्यांच्यामुळे आज स्त्री ही कोणत्याही क्षेत्रांत मागे नाही. स्त्रियांची जीवन शैली ज्यांनी पुर्ण पणे बदलली अश्या “स्त्री शिक्षणाच्या आराध्य दैवत”, भारतातील प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्यध्यापिका, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष अरुण धोटे होते. सत्कारमुर्ती अजय बहुद्देशीय संस्थेच्या संस्थापिका स्वाती घोटकर, उद्घाटक ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, प्रमुख अतिथी जि प सदस्य मेघाताई नलगे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा कवीता उपरे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, नगरसेविका दिपा करमनकर, साधना भाके, माजी सभापती निर्मलाताई कुळमेथे, लहू चहारे, अंजली गुंडावार, कामिनी उईके, अर्चना गर्गेलवार, शुभांगी खामनकर, मंगला हांडे, प्रणाली ताकसांडे, प्रियदर्शनी उमरे, गिरजाबाई जगताप, माया पाकमोडे, ज्योती शेंडे, मनिषा देवाळकर, ज्योती ठावरी, ज्योती धोंगडे, पुष्पा उईके, लता वाघमारे यासह महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा कविता उपरे यांनी केले. सूत्रसंचालन पुनम गिरसाळवे यांनी तर आभार प्रदर्शन संगीता मोहुर्ले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here