फिनोलेक्स  इंडस्ट्रीजकडून वृत्तपत्र विक्रेत्यांना मास्क व पावसाळी टोपी

0
24

सांगली ः प्रतिनिधी
 फिनोलेक्स  इंडस्ट्रीज   व  मुकुल माधव फौंडेशन पुणे यांच्यावतीने सांगलीतील वृत्तपत्र विक्रेत्यांना मास्क व पावसाळी टोपीचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना सलग्न सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
व्यवसाय-उद्योजकता या बरोबरच सामाजिक भान जपत विविध सामाजिक उपक्रम राबवणार्‍या  फिनोलेक्स  इंडस्ट्रीज   व  मुकुल माधव फौंडेशन पुणे यांच्यावतीने वृत्तपत्र विक्रेत्यांना मदत करण्यात आली. कोरोनाच्या संकटकाळातही वृत्तपत्रांच्या माध्यमातुन जनतेपर्यंत खर्‍या व वस्तुनिष्ठ बातम्या पोहचवण्याचे काम वृत्तपत्र विक्रेते करीत आहेत. त्यांच्या या कामाचे कौतुक करीत फिनोलेक्स इंडस्ट्रीजने त्यांंना सुरक्षा साधने पुरवली. 
यावेळी फिनोलेक्स इंडस्ट्रिज लि.चे सांगली जिल्ह्याचे विक्री व्यवस्थापक  शिवशंकर आनेकर व सहव्यवस्थापक श्री परशुराम ओलेकर, सांगली जिह्याचे फिनोलेक्स  कंपनीचे वितरक देसाई मायक्रो इरिगेटर्सचे मालक  दीपेनभाई देसाई व व्यवस्थापक समीर दोशी, दिवेकर मार्केटिंग असोसिएटसचे मालक धनंजय दिवेकर व सचिन दिवेकर हे उपस्थित होते.
 महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, जिल्हा संघटक सचिन चोपडे, शहर जिल्हाध्यक्ष शिवाजी काकडे, कार्याध्यक्ष विशाल रासनकर, खजिनदार दत्तात्रय सरगर, मनपा क्षेत्र अध्यक्ष सचिन माळी, संघटक सुरेश कांबळे, संजय कांबळे, सांगली शहर अध्यक्ष अमोल साबळे, कुपवाड शहर अध्यक्ष बाळासो पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व विक्रेते उपस्थित होते. 
—   ——-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here