पेट्रोल डीझल दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेस चे आंदोलन;

0
4

बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेसच्या माध्यमाने विधानसभा यु.कॉ. अध्यक्ष श्री. चेतन गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली बल्लारपूर नगर परिषद बल्लारपूर समोर आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल व डीझल च्या दरांमध्ये सतत वाढ होत आहे डीझल चे दर पेट्रोलच्या दरपेक्षा अधिक झाले आहे. ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे केंद्र शासन सतत नागरिकांच्या भावनांशी खेळत असून देशातील परिस्थिती वर केंद्र शासनाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही.सध्या संपूर्ण देश कोविड-१९ च्या प्रादुर्भावमुळे हैराण असून त्यावर पेट्रोल व डीझल दरवाढी करणे अत्यंत भावनाशून्यता दर्शवतो. असे आरोप विधानसभा यु.कॉ. अध्यक्ष श्री. चेतन गेडाम यांचे होते.
आंदोलनामध्ये बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष श्री. अध्यक्ष चेतनभाऊ गेडाम, नगरसेवक व बल्लारपूर शहर काँग्रेस अध्यक्ष श्री. निशांत आत्राम, ,विधानसभा महासचिव श्री. अरबाज सिद्दिकी, शंकर महाकाली, तालुका अध्यक्ष श्री. नरेश आनंद, उपाध्यक्ष श्री.अझहर शेख, बल्लारपूर NSUI उपाध्यक्ष श्रीं. अंकीत निवलकर,सचिव श्री. विशाल बोकडे, व अन्य कार्यकर्ता उपस्थित होते!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here