पंचायत समितीत सावित्रीबाई फुले जयंती व ग्रामपंचायतींना स्वच्छता पुरस्काराचे वितरण

0
40

 

सावली

सावली पंचायत समिती येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने तालुक्यातील ग्राम स्वच्छता अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायतींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सावली पंचायत समिती येथे सभापती विजय कोरेवार यांचे अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. त्या निमीत्ताने तालुक्यातील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वछ ग्राम स्पर्धेत जिल्हा परिषद गटातील स्पर्धेत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. बोथली कवठी क्षेत्रातुन घोडेवाही ग्रामपंचायत, व्याहाड हरंबा क्षेत्रातून कढोली ग्रामपंचायत, अंतरगाव निमगाव क्षेत्रातून अंतरगाव ग्रामपंचायत, व्याहाड खुर्द पाथरी क्षेत्रातून व्याहाड खुर्द ग्रामपंचायत यांना पुरस्कार देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या वार्डालाही पुरस्कार देण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी सुनीता मरसकोले, उपसभापती रवींद्र बोलीवार, जिल्हा परिषद सदस्य योगिता डबले, पंचायत समिती सदस्य गणपत कोठारे, पंचायत विस्तार अधिकारी संजीव देवतळे, राजू परसावार उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here