नानासाहेब मंदिर (वाडा), पातुर, अकोला

0
59

नानासाहेब मंदिर (वाडा), पातुर, अकोला

नानासाहेब यांचा जन्म पेशवेकालीन असून इ. स १७०० मधील आहे. त्यांच्या मंदिराच्या बांधकामावरून हा काळ सिद्ध होते, असे वास्तुशास्त्राचे मत आहे. इ स १७४० मध्ये नानासाहेब समाधिस्त झाले. त्यांनी बांधलेली वस्तू हि अत्यंत प्रचंड असून आजही अस्तित्वात आहे. तेथील वास्तू शास्त्रानुसार जे बांधकाम आहे, ते उलेखनीय आहे.

सर्व बांधकाम पक्क्या विटा आणि चुन्यात केले आहे. मंदिराचा मुख्य गाभारा बांधलेला आहे. मुख्य गाभाऱ्याचे खाम्बांचे वैशिष्ट आहे कि, खांब विटांनी बांधलेले आहेत. एक सोडून एक खांबामध्ये आपण प्रहार केला असता ‘मृदुंगासारखा’ आवाज येतो. मंदिराचे क्षेत्रफळ अंदाजे ५० मीटरचे आहे. त्यांचे सभोवतली २०-२० मीटरचे पटांगण असून त्यामध्ये तेथील काही महाराजांच्या दगडी समाधी बांधलेल्या आहेत.

मंदिराच्या सभोवताली पटांगण व चारही बाजूनी दिलवाडा मंदिराप्रमाणे वरंन्डा बांधून अतिशय कलाकृतीने तो सभामंडप तयार केला आहे. तो इतका भव्य आहे कि आजही हजार-पाचशे लोकांचे वास्तव होऊ शकते. समोरच्या भागात भव्य असे दीपस्तंभ उभे आहे. या सर्व भागाला किल्ल्याप्रमाणे सजवले आहे. मंदिराचे प्रवेशद्वार म्हणजे एक गोपुरम सारखे भव्य द्वार आहे. याची उंची पाहली असता २० फुटा वर येते.

या मंदिराच्या आत एक काळा मारोतीचे शिल्प असून याची स्थापना ‘श्री समर्थ रामदास स्वामी’ यांच्या हस्ते झाली. बाहेरून अवलोकन केल्यास निसर्ग रम्य परिस्थितीत किल्यासारखे ती मंदिरे पुरातन वस्तूची एक आठवण देऊन जाते. आजही इतिहास प्रसिद्ध नानासाहेबांचे स्थान अतिशय पवित्र असून हजारो लोक दर्शनासाठी येतात. हे मंदिर पातूरच्या उत्तरेस असून पातूर शहराच्या बाहेर आहे. त्याचप्रमाणे पातूर शहर हे ऐतिहासिक ‘पराशर नागरी’ म्हणून ओळखल्या जाते. आता हि नगरी ‘पातूर नानासाहेब’ यांच्या नावाने ओळखली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here