नवीन वर्षात दुःखद घटना ;जनकापूर रिठात  वाघाच्या हल्यात गुराख्याचा मृत्यू

0
167

 

चंद्रपूर

जनकापूर रिठ येथील गुराखी श्री विनोद नामदेव ठाकरे वय 48 वर्ष हे आज सकाळी गावातील गुरे चराई करिता जंगलात गेले असता, कान्हाळगाव रस्त्याच्या बाजूला दबा धरून असलेल्या वाघाने गुरख्यावर कंपार्टमेंट न. 147 हल्ला करून जागीच ठार केले, जनकापूर रिठ गावाला लागूनच असलेल्या जंगलात ही घटना घडली. मृत व्यक्तीच्या कुटुंबात 2 मे, पत्नी, आणि सासू असा परिवार आहे घरची परिस्थिती बिकट असून मोलमजुरी करून कसे बसे कुटुंब चालवायचे परंतु घरचा कमावताच धनी गेल्यावर त्याचा कुटुंब कसा चालेल असा प्रश्न पडतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here