गेवरा बुज. येथील आरोग्य तपासणीला उत्फूर्त प्रतिसाद;655 रुग्णांनी आरोग्य शिबिराचा घेतला लाभ

0
128

 

सावली
सोबत फॉउंडेशन चंद्रपूर संलग्नित गेवरा बुज. येथील जाणीव रुग्णालयाला एक वर्ष पुर्ण झाले, त्यानिमित्य वर्षपूर्ती सोहळा,वार्षिक अंक प्रकाशन, पोस्टर प्रदर्शनीचे उदघाटन व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,
या कार्यक्रमाचे उदघाटन – डॉ. सागर राजूरकर नेत्रचिकित्सक यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा जाणीव रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज म्हस्के हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सुषमा मुंघाटे सरपंच, डॉ. प्रिया चार्जन अमरावती, तिलक वाढणकर उपसरपंच, संजय रामटेके पोलीस पाटील, संस्थेचे सचिव पुनम झाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सोबत संस्थेच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात येऊन मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू तपासणी नेत्रचिकित्सक डॉ. सागर राजूरकर यांनी 290 रुग्णांची तपासणी केले त्यात 90 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार असून 81 रुग्णांना अत्यल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले.
स्त्रीरोगतज्ञ डॉ. कवीश सांगोले यांनी 30, बालरोग तज्ञ डॉ पल्लवी बापट -पिंगे यांनी 44 तर अस्थीरोगतज्ञ डॉ. चित्तानंद मेंढे 187 रुग्णांची तपासणी केली व त्यांना अत्यल्प दरात औषधोपचार करण्यात आले, विद्यार्थ्यांसाठी निंबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्यात आले, पहिल्या दिवशी उदाराम बावणे महाराज यांनी ग्रामगितेवर आधारित जाहीर कीर्तन केले व दुसऱ्या दिवशी जाणीव रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक प्रबोधनपर व्यसनमुक्तीवर आधारित नाटिका सादर केली यात सहभागी विद्यार्थ्याना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक राऊत, प्रास्ताविक पुनम झाडे तर आभार कीर्ती पिंगे यांनी मानले. समारोपीय कार्यक्रम सरपंच सुषमा मुंघाटे, प्रा. रिना दाजगाये, डॉ. जानकी गुरपूडे म्हस्के, डॉ.प्रिया चार्जन, सुजाता पोरेड्डीवार, वनिता पांचलवार, शारदा श्रीरामे, सविता लोणारे, डॉ. सुरज म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते, या कार्यक्रमाचे संचालन कीर्ती पिंगे – पुनम झाडे, प्रास्ताविक डॉ. जानकी गुरपुडे यांनी तर आभार डॉ. सुरज म्हस्के यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तिलक वाढणकर उपसरपंच, मिथुन बाबनवाडे, हंसराज रामटेके, संजय रामटेके पो.पा, थोमेश्वर कोटरंगे,उषाताई चौधरी, गुरुदेव शेंडे, मयुर बारापात्रे, अश्विनी मोहुर्ले, किर्ती पिंगे, अजय भांडेकर, शारदाताई श्रीरामे, गुरुदेव सेवा मंडळ अंतरंगाव, चिखली, कसरगाव येथील कार्यकर्ते, गेवरा बुज वासियांनी अथक परिश्रम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here