कृषी दिनानिमित्त संतनगरी धाबा येथे वृक्षारोपण

0
7

कृषी दिनानिमित्त संतनगरी धाबा येथे वृक्षारोपण

देवस्थान कमेटी चा उपक्रम :- जि प सदस्यांच्या उपस्थिती

गोंडपिपरी – तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौजा धाबा येथील श्री संत कोंडय्या महाराज देवस्थान कमिटीच्या वतीने कृषी दिनानिमित्त संस्थांच्या खाजगी शेतशिवारात जि प सदस्य चंद्रपूर तथा देवस्थान कमिटी च्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज वृक्षारोपण करण्यात आले.
आयोजित वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, जि प सदस्य वैष्णवी बोडलावार, माजी जिप सदस्य तथा संत कोंड य्या महाराज देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अमर बोडलावार , सचिव किशोर अगस्ती, बाबुराव बोम कंठी वार , धाबा सरपंच रोशनी अनंमुलवांर, स्वप्निल अनमुलवार, प. स. उपसभापती अरुण कोडापे, मनोज कोपावर, हिरा कंदीकुरवार, प्रकाश कावळे, विठ्ठल चनकापुरे, आशिष मामेडपल्लीवार, प्रवीण मेश्राम, पत्रकार निलेश झाडे आ दि प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत कोंडाय्या महाराज देवस्थान कमिटीच्या शेत शिवारामध्ये ४५० टीशू कल्चर बांबू रोप व विविध जातीच्या वृक्षांचे रोपण करून उपस्थितांना कृषी दिनाचे महत्त्व पटवून देत वृक्षारोपण काळाची गरज असल्याचे सांगत वृक्षारोपण व त्याचे संगोपन हे मानव जातीला कितपत उपयुक्त आहेत याबद्दल मार्गदर्शनही केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थांचे इतर पदाधिकारी तथा गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here