ओमीक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सुसज्ज राहा ;खासदार ,आमदार आरोग्य यंत्रणेची पाहणी करणार

0
68

 

चंद्रपूर

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणत मृत्यूच्या घटना घडल्या. उपचाराच्या अपुऱ्या साधन सामुग्री व नियोजनाच्या अभावामुळे आपले अनेक जवळचे व्यक्ती मरण पावले. हि परिस्थिती पुन्हा उद्भवू नये याकरिता खासदार बाळू धानोरकर आणि प्रतिभाताई धानोरकर यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेत काही सूचना केल्यात. त्यासोबतच काही दिवसात ते प्रत्यक्ष आरोग्य विभागाची पाहणी करण्यासाठी भेटी देणार आहेत.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, डॉ. प्रतीक बोरकर, डॉ. असुटकर, डॉ. मिलिंद सोमकुवर, डॉ. मनीष सिंधु, डॉ. अंकुश राठोड, डॉ. हेमचंद्र कन्नाके, डॉ. बाळू मंजुरकर यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात पहिल्या लाटेच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव उद्भवल्यामुळे दुसऱ्या लाटेत नियोजनाचा अभाव दिसून आला. आता तिसऱ्या लाटेचे सावंट दिसून येत आहे. त्यामुळे आता नियोजनाच्या अभावामुळे कुणाचा जीव जाता कामा नये. याकरिता ओमीक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सुसज्ज राहा अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या.

त्यासोबतच ओमीक्रॉनची टेस्टिंग प्रयोग शाळा फक्त दिल्ली येथे असल्यामुळे येणार अहवाल उशिरा येतो. त्यामुळे विभागीय स्तरावर टेस्टिंग प्रयोग शाळा एम्स किंवा मेयो नागपुर येथे त्वरित व्हावा, एस जीन टेस्ट किट्स शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे पुरेशा प्रमाणात उपलब्ध कराव्यात व RTPCR टेस्ट करीता मनुष्यबळ उपलब्ध करावे, मनपा चंद्रपूर क्षेत्रात मनपातर्फे ४०० बेड्सचे अद्ययावत रुग्णालय संपूर्ण ऑक्सिजन बेडसह त्वरित उभारावे व मनपाने वन अकादमी देखील ताब्यात घ्यावी, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तालुका स्तरावर वैद्यकीय अधिकारी व पॅरामेडिकल स्टॉप घ्यावा, मनपा हद्दीत वैद्यकीय सेवेकरिता २ समर्पित रुग्णवाहिका सेवेत ठेवावी, नगर परिषद व महानगरपालिका तर्फे रुग्णाकरीता गृह विलगीकरणाची व्यवस्था करावी, प्रत्येक तालुक्यावर कोविड केअर सेंटर उभारावे, वरोरा येथे १०० बेड्सचे रुग्णालय मंजूर आहे. हि जागा ट्रामा केअर ला लागून हायवे लगत द्यावी अशा लोकहितकारी सूचना खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केल्या आहे.

वरील बाबी त्वरित मार्गी लावण्यासाठी लेखी पत्र पालकमंत्री विजय वडेट्टीवार व जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिले. वरील बाबी त्वरित केल्यास येणारी परिस्थिती हाताळण्यासाठी सोईचे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here