ऑनलाईन वर्ग केवळ रिलायन्स नेटवर्कच्या जिओ अॅपच्या माध्यमातून सुरू करण्यामागे आघाडी सरकारचं काळंबेरं

0
20

 – आमदार अतुल भातखळकर यांचा आरोप  

मुंबई, दि. 6 जुलै, (प्रतिनिधी)

राज्यामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिक्षण व्यवस्था करताना ते केवळ रिलायन्स नेटवर्कच्या जिओ अॅयपच्या माध्यमातून सुरु करण्यामागे महाविकास आघाडी सरकारचं नक्की काय काळंबेरं आहे ? असा सवाल भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारला केला आहे.
आमदार भातखळकर यांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून सुरू करणार्या् राज्य सरकारवर निशाणा साधत प्रश्नांची विचारणा केली आहे. सरकारने बीएसएनएलच्या नेटवर्कच्या माध्यमातून हे वर्ग का सुरू केले नाहीत? माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बहुसंख्य शाळा या ग्रामीण भागात  असताना बीएसएनएलचे नेटवर्क न वापरण्याचा निर्णय आनकलनीय आहे, दूरदर्शन सह्याद्री चॅनेलचा वापर का केला नाही? अन्य इतर खाजगी कंपन्यांकडे सरकारने विचारणा केली होती का? असे प्रश्न आमदार भातखळकर यांनी सरकारला विचारले आहेत. केंद्र सरकारने देशामध्ये दूरदर्शन नेटवर्कच्या माध्यमातून शिक्षणाच्या संदर्भात उपक्रम सुरू केले आहेत. राज्यातही सह्याद्री चॅनेलच्या माध्यमातून सरकार हे उपक्रम चालू करू शकले असते परंतु शिक्षण सम्राटांशी छुपी हातमिळवणी करणार्याय या सरकारने खाजगी कंपन्यांची धन करण्याचा विडाच उचलला आहे असे दिसते अशी टीकाही त्यांनी केली. जर का राज्य सरकारला जिओ अॅचपच्या माध्यमातूनच शिक्षण देण्याचा इतका सोस असेल तर सिम कार्ड व डेटा पॅकचा खर्च राज्य सरकारने करावा अशी मागणी ही त्यांनी केली आहे. शिक्षकांचे पगार होत नसताना शिक्षणमंत्री स्वतःकरिता लाखो रुपयांची आलीशान गाडी घेण्यात मग्न आहेत तर मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी केलेल्या मलईदार बदल्या रद्द करण्यात मग्न आहेत. राज्य शासनाच्या फी वाढ न करण्याच्या शासन निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार्याय कासेगाव एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेशी राज्य मंत्रिमंडळतील सांगली जिल्हयातील कोण पाटील मंत्री संबंधित आहेत याची चौकशी करण्याची गरज आहे असे ही श्री. भातखळकर यांनी म्हटले आहे. या संदर्भात ‘मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारख कर’ असेच घडले आहे या आरोपाचा पुनरुच्चार करून फी वाढीच्या विरोधातला वटहुकुम सरकार का काढत नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारला      आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here