आमदार सुभाष धोटे यांनी दिल्या क्षेत्रातील गावांना भेटी

0
37

 

गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी करणार पाठपुरावा

राजुरा

आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील सास्ती – गोवरी जिल्हा परिषद क्षेत्रातील बाबापूर, मानोली, कढोली, चार्ली, निर्ली, धिडसी, मारडा, पेल्लोरा इत्यादी गावांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील गावकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याची हमी दिली. ते येणाऱ्या काळात क्षेत्रातील अनेक गावांना भेटी देणार असून या जनसंपर्क दौऱ्यांच्या माध्यमातून थेट जनतेत जाऊन त्यांच्या अडचणी जाणून त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा घेणार आहेत. वरील सर्व गावांमध्ये आमदार सुभाष धोटे यांचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले आणि उत्तम प्रतिसाद दिला.
या राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, लक्ष्मण ऐकरे, बळीराम वैध, राजुरा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष शेंडे, प्रा. प्रफुल्ल शेंडे यासह सर्व गावातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here