अहेरी पत्रकार संघटनेची कार्यकारिणी गठित

0
7

 

अहेरी

अहेरी तालुका पत्रकार संघटनेची नवीन कार्यकारिणी रविवारी स्थानिक जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात गठीत करण्यात आले. यात अध्यक्षपदी ऋषी सुखदेवे सचिवपदी अशोक पागे यांची निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गिरीश मद्देरला वार होते. कार्यकारणीत अध्यक्षपदी ऋषी सुखदेवे यांची निवड सर्वानुमते तर सचिवपदी अशोक पागे उपाध्यक्षपदी अमित बेझलवार तर कोषाध्यक्षपदी विजय सूनतकर यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्यकारिणीच्या सदस्यपदी सुरेंद्र अलोने, विवेक बेझलवार, प्रकाश दुर्गे, दिपक सूनतकर, प्रतीक मुधोळकर, सुधाकर उमरगुंडावार संतोष मद्दीवार संजय धुर्वे तर अहेरी पत्रकार संघटनेला अधिक बळकट व सक्षम करण्याकरिता नेहमी मार्गदर्शन करणारे जेष्ठ पत्रकार प्रकाश दुर्गे,गिरीश मद्देरलावार यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली.यावेळी संघटनेच्या वतीने नवनियुक्त पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. संघटना सक्षम व बळकटीकरण व विविध सामाजिक स्तुती प्रिय उपक्रम राबवण्यात संदर्भात सविस्तर चर्चा या वेळी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here